राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे.राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला.
ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.
मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांनीच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
