महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून एक दोन दिवसात त्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. भाजपला १२६ जागा, शिंदे गटाला ९० जागा, अजित पवार गटाला ७२ जागा देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या यांच्या उपस्थितीत हे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे बोलेल जात आहे. शिंदे गटाने १०० हून अधिक जागांची मागणी केली होती. पण, त्यांना ९० जागेवरच समाधान मानावे लागणार आहे. तर अजित पवार गटाला ८० ते ८५ जागा हव्या होत्या. पण, त्यांच्या गटाला ७२ जागा देण्यात आल्या आहे. या जागेतूनच मित्र पक्षाला तिन्ही गट जागा देणार असल्याचे बोलले जात आहे.
Related Posts
लोकसभेचा निकाल येताच मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल
लोकसभा निकालात महाराष्ट्राने भाजपच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले. यामध्ये मराठा फॅक्टर अनेक मतदारसंघात प्रभावी दिसला. भाजपच्या काही दिग्गजांना मराठा फॅक्टराचा…
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
घाटकोपर पूर्व येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा…
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस !
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत…