शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने इस्लामपूर नगरपरिषदेला घेराव घालून विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांशी मागण्यावर तोडगा निघाल्याने आंदोलनाला यश आल्याची माहिती उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांनी दिली. इस्लामपूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांवर मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल मर्ढेकर, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, कर अधिकारी पद्मश्री वाईंगडे यांनी माजी नगरसेवक शकिल सय्यद यांच्याशी चर्चा केली. बंद केलेले नळ कनेक्शन तात्काळ जोडणी करत थकीत पाणीपट्टी ४ टप्प्यात भरावी.
शास्ती कर लागलेल्या मालमत्ताधारकांनी शास्ती कर सोडुन घरपट्टी ३१ मार्च पुर्वी दोन टप्यांत भरण्याचा निर्णय चर्चेत झाल्याचे सय्यद यांनी सांगितले. शिवाय सुरळीत पाणीपुरवठा, उखडलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क, निधी उपलब्ध रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे ठरले. स्वच्छता ठेका, गुंठेवारीबाबत संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळा समवेत बैठक घेऊन लवकरच निर्णय होणार आहे. शहर उपनगरातील जनतेने थकीत पाणीपट्टी ४ टप्प्यांत भरावी. ज्या मालमत्ताधारकांना शास्तीकर आकारला आहे तो वगळुन घरपट्टी २ टप्प्यांत भरावी असे आवाहन शकिल सय्यद यांनी केले.