लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे कमावण्याची संधी; शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग कधी?

दिवाळी म्हटंल की, दिव्यांची आरास, रोशनाई, फटाके आणि चमचमीत पदार्थ खायला मिळतात. दिवाळी या सणाला धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे तितकेच आर्थिकदृष्ट्याही महत्त्व आहे. दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो.

या सणात अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतात तर काही शेअर बाजारात गुंतवणूक करतात. या काळात शेअर बाजारात दिवाळीच्या निमित्ताने विशेष ट्रेडिंग सत्र पार पडते. परंतु, दिवाळीनिमित्त शेअर बाजारातील व्यवहार सुट्टीमुळे बंद असतात. मात्र दिवाळीत एका दिवासासाठी शेअर बाजारात आपण भरघोस कमाई करु शकतो.

या काळात गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग करतात. शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्यास वर्षभर गुंतवणूक चांगली राहाते. जर तुम्हालाही लक्ष्मी पूजनाला  पैसे कमवायचे असेल तर तारीख आणि वेळ लक्षात ठेवा.

1. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ 

NSE ने दिलेल्या माहितीनुसार शेअर बाजारात १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ ते ७.१५ या वेळेत ट्रेडिंग करता येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग सत्रात प्री- ओपनिंग, ब्लॉक डील विंडो तर सामान्य गुंतवणुकदारांसाठी बाजार ओपन असणार आहे.

2. मुहूर्त ट्रे़डिंगची वेळ

  • ब्लॉक डिल सेशन – संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत
  • प्री-ओपनिंग सेशन- संध्याकाळी ६ ते ६.०८ वाजेपर्यंत
  • नॉर्मल मार्केट – संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत
  • कॉल ऑक्शन सेशन – संध्याकाळी ६.२० ते ७.०५ वाजेपर्यंत
  • क्लोजिंग सेशन- संध्याकाळी ७. १७ ते ७. २५ वाजेपर्यंत

या काळात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ट्रेडिंगचा मुहूर्त असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चांगली गुंतवणूक करुन विशेष परतावा मिळवू शकतात. या दिवशी एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात तेजी कायम राहाण्याची शक्यता आहे. मुहूर्त सुरु होण्याआधी शेअर बाजारात गणेश-लक्ष्मी पूजन होते. यंदा मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स ६० हजार अंकाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.