आशियातील सर्वात मोठ्या स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचे केले भूमिपूजन…

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन प्रथमतः गणेश चतुर्थीच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचे ठरले. या भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी ११ सप्टेंबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम तसेच १२ सप्टेंबर रोजी ठरलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलकांनी दिला होता.

ठरल्याप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम पार पडला. या उपोषणाच्या वेळी धारावी पुनर्विकास परियोजना प्राइवेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) पोलीस उपायुक्त परिमंडळ १२ सप्टेंबर रोजीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केल्याचा निरोप पाठवला. डीआरपीपीएलने दिलेली माहिती आणि पोलिसांची विनंती यांना मान देऊन धारावी बचाव आंदोलनाने उपोषणाचा तसेच १२ तारखेच्या आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित केला होता.