सोमवारी 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची (Eid-e-Milad-Un-Nabi 2024) सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. यादिवशी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात.
यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत.
त्यामुळे सोमवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवारी ईद-ए-मिलादची सुट्टी मिळणार आहे.