Breaking: मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी घोषणा!

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. याआधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती.

परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदेंनी सभागृहात दिली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीची देखील अट काढण्यात आली आहे.