शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा उधळल्याचं समोर आलं आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हीडिओ ट्विट केला. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.12 सप्टेंबर 2024 ला आनंद दिघे यांच्या आश्रमात पैशांची उधळण करण्यात आली आहे. यावरून सध्या वातावरण तापलं आहे.
विरोधकांकडून विशेषत : शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोर जोरदार टीका केली जात आहे. अशातच शिवसेनेकडून पैसा उधणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आनंद आश्रममध्ये पैशांची उधळण करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाचा खुलासाही मागण्यात आला आहे.आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या आनंद आश्रमामध्ये दिघे यांच्या फोटोसमोर पैशांची उधळण करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली. आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती. त्या वास्तूमध्ये ते न्याय द्यायचे. तिथे त्यांचं वास्तव्य होतं.
त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेच्या लोकांनी गुंडांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात. त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला. हे चित्र अत्यंत विचलित करणारा चित्र आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढल असेल अमुक असेल ही पूर्णपणे नौटंकी आहे, असं संजय राऊत म्हणालेत.