रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबरला इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या वतीने मनसे केसरी 2024 जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली. उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे पै. आशिष हुड्डा यांच्यामध्ये पाच लाख रुपयांची कुस्ती होत आहे.
महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व दिल्लीचे पै. दीपक कुमार यांच्यामध्ये पाच लाख रुपयांची कुस्ती होईल. सकाळी दहा ते बारा या वेळेत शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या जोडण्यात येतील. तर मैदानाची वेळ दुपारी तीन वाजता असेल.