भारतातील सर्व अभियांत्रिकी प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांपैकी एक म्हणजे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE – Joint Entrance Examination), जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) सारख्या चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत करते.
JEE Advanced द्वारे आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) मध्ये प्रवेश घेऊ शकतोJEE मेनच्या तयारीसाठी चांगला अभ्यास, अभ्यासाचे योग्य नियोजन व शिस्त असणे आवश्यक आहे. ऑनलाइन स्रोत सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करण्याचा पर्याय निवडत आहेत. जर तुम्ही देखील येणाऱ्या JEE Main 2025 ची परीक्षा देणार आहात तर तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप असणार आहे.
विद्यार्थ्यांनी जेईई मेनचा अभ्यास कसा करावा, याविषयी जाणून घेऊयात….
कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि परीक्षेची रचना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेईई मेनमध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर हा BE किंवा BTec चे शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्यांसाठी असतो.
ते या पेपरवर अधिक लक्ष केंद्रित करतात तर दुसरा पेपर BArch or BPlanning साठी असतो. पहिला पेपर गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र अशा तीन विषयांमध्ये विभागलेला आहे. यापैकी प्रत्येक विषयाला समान महत्त्व आहे. त्यासाठी विचारलेले प्रश्न पर्यायी स्वरूपाचे असतात आणि चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुण मिळतात.
भौतिकशास्त्रामध्ये – Modern physics, mechanics, electrodynamics, thermodynamics व Optics हे सर्वांत महत्त्वाचे विषय आहेत.
रसायनशास्त्रामध्ये Inorganic, physical व organic chemistry कडे विशेष लक्ष द्यावे.
गणितामध्ये Geometry, Algebra, Calculus व Trigonometry वर जास्त भर द्यावा.
अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
दैनंदिन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा – तुम्हाला जमेल आणि सोपे पडेल अशा भागांमध्ये अभ्यासाचे विभाजन करा. त्यानंतर दैनंदिन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक विषयासाठी दररोज किती वेळ द्यावा, हे ठरवा; जेणेकरून तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन करता येईल.
आठवड्यातून एकदा पुनरावलोकन करा – आपण पूर्ण आठवडा काय अभ्यास केला, याचे एकदा पुनरावलोकन करा. त्यासाठी एक दिवस निवडा. त्यामुळे तुम्हाला अभ्यास नीट लक्षात राहतो आणि पुनरावलोकन करताना तुम्हाला आलेल्या अडचणींमुळे कोणत्या विषयाचा आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, हे तुमच्या लक्षात येते.
मॉक परीक्षा – आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मॉक परीक्षेचे नियोजन करा. वारंवार मॉक परीक्षा दिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.
स्वमूल्यांकन आणि नियमित सराव गरजेचा- जेईई मेनचा अभ्यास करताना सातत्याने अभ्यासाचा सराव करणे आणि मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या पूर्वीच्या सर्व जेईई मेन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा.
कमकुवत विषयांकडे लक्ष द्या – जे विषय तुम्हाला कठीण वाटतात किंवा सराव परीक्षेत तुम्हाला ज्या विषयांची उत्तरे लिहिण्यास अडचण जाते, त्यावर लक्ष द्या. इंटनेटचा वापर करा आणि विषय नीट समजून घ्या.