विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे – रणजितसिंह निंबाळकर

सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, गणेश चिवटे, युवा नेते दिग्विजय बागल, शिवाजी गायकवाड, हणमंत सुळ, योगेश बोबडे, रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, नवनाथ पवार, सोपान नानवर, बाळासाहेब सरगर, प्रतीक्षा गोफणे, संध्या कुंभेजकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीनंतर सध्या चार विधानसभा मतदारसंघात आपण ठरवेल तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नरेटीव्ह सेट केल्याने लोकसभेत पराभव झाला. कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी जोमाने तयारीला लागावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.