अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? विरुष्काच्या व्हिडीओनं वेधलं अनेकांचे लक्ष!

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा  हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा होणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता विरुष्का बेंगळुरू येथे स्पॉट झाले आहेत. बेंगळुरू येथील अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

विरुष्काचा व्हिडीओ व्हायरल

विरुष्काच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का ही विराटसोबत हॉटेलबाहेर फिरताना दिसत आहे. विराटने तिचा हात पकडला आहे, असंही दिसत आहे. अनुष्कानं काळ्या रंगाचा शॉर्ट फ्लेर्ड ड्रेस घातला आहे .ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे मत आहे. विरुष्काच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अनुष्का आणि विराटच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “अनुष्का प्रेग्नंट आहे?” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “ज्युनिअर विराट येणार आहे, अनुष्का प्रेग्नंट आहे.”