इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात झाला. अनंत चतुर्दशी दिवशी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचे पंचगंगा नदी तसेच शहापूर खण येथे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांसह कुटुंब उपस्थित होते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवून सर्वत्र कचरा निर्माण झाला होता. सदर बाब निदर्शनास आल्याने अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शहरातील मुख्य मार्गासह पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता तातडीने करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी यापूर्वीच आरोग्य विभागास दिले होते.
या आदेशानुसार बुधवारी पहाटे ५ वाजलेपासून आरोग्यविभागाच्या जवळपास ५०० कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यासह पंचगंगा नदी घाट परिसराचीस्वच्छता करून जवळपास ८ टन निर्माल्य आणि ४ टन कचरा संकलित केला.