4 ऑक्टोंबरला होणार मराठा समाजमध्ये शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण!

सांगलीतील मराठा समाज संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सव साजरा केला जात असून मराठा समाज संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांच्या वंशजांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या निमित्ताने सांगलीतील संस्थेमध्ये शिवाजी महाराजांची आठ फुट आठ फुटी सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण 4 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेली आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.