साजणीत खास. मानेंच्या हस्ते घरकुलांचा गृहप्रवेश!

हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे प्रधानमंत्री आवास योजना मधील पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश समारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक एक मधील बंडू महादेव यादव (सर्वसाधारण) व श्रीमती शशिकला विजय कांबळे (अनुसूचित जाती ) यांच्या पूर्ण झालेल्या घरकुलांचा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूकीने खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः खांद्यावर गारव्याची शिदोरी घेऊन लाभार्थी कुटुंबांना दिली. तसेच चावी व प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. स्वागत सरपंच शिवाजी पाटील यांनी केले.