शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभं करावं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला पन्नास खोकी दिली आहेत, असं जाहीर करावं.
नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला काय पन्नास खोकी-बोकी दिलेली नाहीत.
महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आधारित ‘मला काय सांगायचं’ हे नाटक येत आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘पन्नास खोकी एकदम ओके’ या नाटकाच्या माध्यमातून उत्तराची तयारी चालवली आहे.
त्याबाबत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यापासून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत.