सांगोला शहरात हिरवे पिवळे आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा

काय झाडी… काय डोंगर… … काय हॉटेल या डायलॉगने फेमस झालेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यात ऐन दिवाळीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सध्या जो पाणी पुरवठा होत आहे तो अशुद्ध आणि हिरव्या पिवळ्या रंगांचे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सांगोला नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा प्रशासनावर वचक नसल्याने अधिकाऱ्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

अशा परिस्थितीत आमदार शहाजीबापू पाटील हे अधिकार्यांवर वचक ठेवून प्रशासनात सुसूत्रता आणणार का ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. ऐन दिवाळीत सांगोला शहरातील रहिवाशांना पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ऐन दिवाळीत पाणी टंचाईची स्थिती असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यातच ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने नगरपालिकेचा दिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

एकीकडे सांगोला शहरातील नागरिक शुद्ध पाण्यासाठी वणवण करीत असताना दुसरीकडे मुख्याधिकारी डॉ. गवळी मात्र दिवाळीचा आनंद घेण्यासाठी गावी गेले आहेत. सध्या नगरपालिकेत प्रशासक असल्याने नगरपालिकेत मनमानी कारभार सुरू आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काय झाडी…. काय डोंगर… काय हॉटेल या डायलॉगने महाराष्ट्रात फेमस झालेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यात ऐन दिवाळीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सांगोला नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा प्रशासनावर वचक नसल्याने अधिकाऱ्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. अशा परिस्थितीत आमदार शहाजीबापू पाटील हे अधिकार्यावर वचक ठेवून प्रशासनात सुसूत्रता आणणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. मात्र, त्यांना सांगोला शहराला शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात अपयश आले आहे. नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी हे हजर राहत नसल्याने प्रशासनावर वचक राहिला नाही. त्यामुळे सांगोला शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे नगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर वचक ठेवणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.