सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. सांगोला विधानसभा मतदार संघातील स्व. डॉ. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत एकाच पक्षात राहून एकाच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी अकरा वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम देखील केलेला आहे.
त्यांनी राजकारणाचा वापर फक्त समाजसेवेसाठी केला. अनेक विकास कामे त्यांनी केलेली आहेत.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी विकासाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. राजकारण करीत असताना बाबासाहेबांनी निष्ठेला महत्त्व दिलेले आहे.
आयुष्यभर त्यांनी आपली निष्ठा जपली तसेच त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही आणि संपूर्ण जनता हेच आपले कुटुंब समजून त्यांनी काम केले. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणे अवघड आहे.
राजकीय व सामाजिक वाटचाल ही बाबासाहेबांच्या विचारावरती करणे कठीण काम असले तरी सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरीही चालेल परंतु आबासाहेबांचे विचार सोडणार नसल्याचे मत हे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे.