दिपकआबांच्या उपस्थितीत बुध्देहाळ गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश! विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार 

शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ (करंडेवाडी) गावात शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.

बुध्देहाळ (करंडेवाडी) येथील शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सोपान करंडे, शिवाजी दामू नरळे, ॲड.नवनाथ खट्टे, आनंदा हिप्परकर, माऊली गोडसे या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना बुध्देहाळ (करंडेवाडी) गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून बुध्देहाळ (करंडेवाडी) गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ (करंडेवाडी) गावात शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.