शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी पूरक म्हणून अतिशय उत्कृष्ट रीतीने तालुक्यामध्ये सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये दूध उत्पादनामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी या दूध उत्पादक संस्थेने गाय आणि म्हैस यामध्ये जास्त दूध उत्पादन करणाऱ्या प्रथम तीन दूध उत्पादकांना अनुक्रमे मिक्सर, फॅन व कुकर अशा भेटवस्तू बरोबर भरघोस बोनस वाटप केले. हा कार्यक्रम गोकुळ हॉटेल या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे मा. चिटणीस विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व शेकाप पुरोगामी युवक संघटनचे प्रदेशाअध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख राज्य यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अकोला गावातून बरेच दूध उत्पादक हजर होते. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे सर यांनी अतिशय बहुमोल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गोकुळ दूध संघाचे विस्तार सुपरवायझर मा. श्री उदय आंबी तसेच ज्येष्ठ दूध उत्पादक चंद्रकांत गव्हाणे हे उपस्थित होते. या दूध उत्पादक संस्थेचे सध्या ३५० सभासद आहेत. सदर दूध संस्थेने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये दूध उत्पादकांना दहा लाख ६१ हजार २६१ रुपये चा बोनस वाटप केला. तसेच गाईसाठी प्रति लिटर एक रुपया २३ पैसे व म्हशीसाठी दोन रुपये २२ पैसे अशा प्रकारचा बोनस देण्यात आला.
यावेळी विश्व मानव अधिकार आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने प्रा. डॉ. अशोकराव शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब देशमुख व दूध संस्थेच्या चेअरमन सौ. राणी संभाजी चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अकोल्याचे विद्यमान डेप्युटी सरपंच श्री गणेश शिंदे त्याचबरोबर मा. आप्पासाहेब शिंदे, डेप्युटी सरपंच प्रमोद काळे, सुरेश चंदनशिवे, हनुमंत लिगाडे, दीपक खटकाळे सर तसेच अकोले गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री संभाजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन श्री विकास शिंदे सर यांनी केले.