डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात योगा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

– पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर पुरुष व महिला गटाच्या योगा स्पर्धा सांगोला येथील क्रीडा क्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे मोठ्या उत्साहात योगा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये ४७ महिला खेळाडू व २५ पुरुष खेळाडूंनी भाग घेऊन योगासना मधील विविध प्रकारच्या आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले त्या स्पर्धेचे उद्घाटन संस्था सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलांनी होते सांगोला तालुक्या मध्ये विद्यापीठ स्तरावरील योगाच्या स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी सांगोला शहरातील योग प्रेमींनी गर्दी केली होती.

प्रत्येक खेळाडूला १० असणे करून दाखवणे बंधनकारक असल्यामुळे आणि त्याला वेळेचे बंधन असल्यामुळे ही अवघड आसनांची प्रात्यक्षिके करत असताना चांगलीच कसरत करावी लागत होती. सदर योगा स्पर्धेसाठी पंच म्हणून सौ. रत्नप्रभा माळी मॅडम सांगोला डॉ. सुरेश लांडगे बार्शी प्रा. डॉ. प्रशांत तांबिले कुर्डुवाडी प्रा. डॉ. वी. एस. निंबाळकर बार्शी सेवानिवृत्त प्राध्यापक जी.एस. फडतरे योग केंद्र बार्शी व प्रा. डॉ. खंडू चव्हाण बार्शी यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था सदस्य प्रा. डॉ. अशोकराव शिंदे प्रा. दीपक खटकाळे प्रा डॉ. आनंद ढवन सांगोला प्रा. भक्तराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलांनी यांच्या मार्गदर्शना खाली योगा स्पर्धेचे अतिशय नीटनेटके नियोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार, प्रा. ज्योतिबा हरदुखे, राकेश खडतरे व महाविद्यालयातील इतर खेळाडू यांनी परिश्रम घेतले.. सदर स्पर्धेतून महिला गटात प्रथम क्रमांक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर द्वितीय क्रमांक ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर व तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय बार्शी यांनी पटकाविला तर मुलांच्या मध्ये सर्वोत्कृष्ट योगपटू म्हणून अथर्व गुरुजी व्ही. जे. शिवदारे महाविद्यालय सोलापूर, द्वितीय क्रमांक अनिचेत मेहत्रे बी.पी.एड कॉलेज सोलापूर, तृतीय क्रमांक तुषार अवताडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी पटकाविले.