मराठा आरक्षणानाने निवडणुकीची हवा फिरवली! सोलापूर, माढ्यात….

लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला. महाराष्ट्रात मविआने महायुतीला धोबीपछाड केले.आतापराभवाची कारणे समोर येईल. बीडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे (Manoj Jarange) फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात फक्त मनोज जरागेंचा इफेक्ट दिसला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना 45420 मत तर मोहोळ मतदारसंघातून 63152 मतांचे असे एकूण 1 लाख 8572 मतांचे मताधिक्य दिले आणि यामुळेच हा विजय झाला. माढा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आ बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 52515 मतांचे तर करमाळा येथे अजित दादा गटाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून 41511 मतांचे मताधिक्य मिळाले.

ज्या सांगोला मतदारसंघात मोहिते पाटील 25 हजारांनी मागे राहणे अपेक्षित होते तेथेही जरांगेमुळे केवळ 4482 मतांनी मागे राहिले. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा रोष भाजपला भोवला आणि जोडीला मुस्लिम व मागासवर्गीय यांनी केल्या विरोधी मतदानामुळे भाजपाच्या हातून या दोन्ही जागा गेल्या.