वडीलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मंगळवेढा तालुक्यातील एका तरुणावर चाकुने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल सकाळी 11 च्या सुमारास जुनोनी (ता.मंगळवेढा) गावातील स्टॅन्ड चौकात घडली आहे.
याप्रकरणी नितीन उत्तम आवघडे, समाधान उत्तम आवघडे, तेजश गौतम नवघरे (सर्व रा.जुनोनी ता.मंगळवेढा जि.सोलापूर) या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल भिकू कांबळे (वय 25 रा.जुनोनी ता.मंगळवेढा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.11 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास फिर्यादी अमोल कांबळे हे जुनोनी गावातील स्टॅन्ड चौकात उभा असताना ग्रामपंचायत कार्यालय जुनोनी येथे फिर्यादीच्या वडीलांसोबत झालेले भांडणाचा राग मनात धरूननितीन उत्तम आवघडे, समाधान उत्तम आवघडे, तेजश गौतम नवघरे यांनी संगणमत करून येऊन फिर्यादी अमोल कांबळे यास, तुला मस्ती आली आहे, तुझी मस्ती काढतो, म्हणून शिवीगाळी दमदाटी करूनसमाधान आवघडे याने फिर्यादीस पकडून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने नितीन उत्तम आवघडे याने त्याचे हातातील चाकूने फिर्यादीच्या डोकीत मारून तेजश गौतम नवघरे याने त्याचे हातातील चाकूने फिर्यादिस जिवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या डावे बाजूचे बगलेत व डावे बाजुचे बरगडीचे खाली पोटावर जोरात मारून फिर्यादीस गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वरील आरोपींविरोधात भा.द.वि.का.क-307, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.