बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दमदार सुरू आहे. आतापर्यंतच्या सीझनमधील हा सर्वात हिट सीझन ठरला आहे. मात्र हा सीझन आता 70 दिवसातच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. मराठी बिग बॉस लवकर संपणार अशा चर्चा होत्या मात्र कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉस यांनी स्वत: घरातील सदस्यांना याची माहिती दिली.सीझन लवकर संपणार हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांप्रमाणे घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे. बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दणकून प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे.
सध्या घरात 8 सदस्य आहेत. त्यातील टॉप 5 सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणार आहेत.उरलेल्या 14 दिवसांमध्ये 3 सदस्य घराबाहेर होणार आहेत. बिग बॉसने या आठवड्यात घरातील सगळ्या सदस्यांना नॉमिनेट केलं आहे. बिग बॉसने फिनालेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फिनालेच्या घोषणेनंतर कोण विजेता होणार याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी सीझन 5च्या विजेत्याची नाव सांगून टाकली आहेत.प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, टॉप 3मध्ये पहिला सूरज, दुसरा पॅडी दादा, तिसरा डिपी दादा असावा.तर काहींनी पॅडी दादा, अंकिता, डीपी भाऊ अशी नाव घेतली आहेत. तर काहींनी अभिजीत, सूरज आणि डीपी दादा यांची नाव टॉप 3 साठी घेतली आहेत.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5चा विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. विजेतेपदासाठी सूरजचं नाव चर्चेत आहे. चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात सूरजला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे. आता 6ऑक्टोबरच्या फिनालेला नक्की कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.