लातूर जिल्ह्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. राज्यस्थान मधील कोट्यानंतर महाराष्ट्रातील लातूरमध्ये सर्वात जास्त डॉक्टर व इंजिनियर्स होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने अनेक विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलतात. असाच काहीसा प्रकार आज (३ मे) समोर आला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा उद्या होणार आहे. मात्र लातूरमध्ये नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.
अनिकेत अंकुश कानगुडे असून तो मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता. दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही. पुन्हा तो नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होता मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच, या विद्यार्थ्याने लातूरमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. अनिकेत कानगुडे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवाशी आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस करत आहेत.