संजय गांधी लाभार्थ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

हातकणंगले संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातकणंगले तहसील कार्यालयातून चालते. परंतु, या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.

त्यासोबत वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरीत होणाऱ्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी, उत्पन्न दाखल्याची मर्यादा एक लाखापर्यंत करण्यात यावी. लाभार्थ्यांना दरमहा चार हजार रुपये अनुदान मिळावे. रेशनकार्डमधील नावे कमी करणे, वाढविणे यासाठी ग्रामीण भागात दोन दिवस कॅम्पचे आयोजन करावे; आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.