इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास शिवसेना ( शिंदे गट) कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा वैशाली ताई डोंगरे यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रुग्णालयातील सर्व कार्यरत असणाऱ्या तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या विभागांना भेट देऊन त्या विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला तसेच त्या विभागात कार्यरत असलेल्या स्टाफ व दाखल असणाऱ्या रुग्णांची विचारपूस करून असलेल्या उपचाराबाबत रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
सध्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करून रुग्णलायतील असलेली स्वच्छता पाहून त्यांनी खूप समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालयीन कामकाज पाहून सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रशंसा केली. यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी यांच्याशी रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांची चर्चा करून ते लवकरच मार्गी लावू असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मोरे, रुग्णालयाच्या सहा अधिसेविका सीमा कदम उपस्थित होत्या.