सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असलेली पाहायला मिळतच आहेत. अशातच कोणत्या मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी तर तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून भास्कर शेटे यांचे नाव भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे पक्ष यांच्यात सध्या चर्चेला आलेले आहे. दरम्यान दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर त्यांची बैठकी पार पडली आहे.
ऑक्टोंबर महिन्यात त्यांना बोलावणे येईल आणि पुन्हा एकदा लढण्याची आणि उमेदवारीची रणनीती पक्की होण्याची शक्यता आहे. या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे. दरम्यान हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना शिंदे पक्षाला सुटेल अशा दृष्टीने येथे चर्चा सुरू झालेली आहे.