Bigg Boss Marathi 5 Winner : टॉप 3 ठरले; विजेत्याचं नावही आलं समोर, महाराष्ट्राला वेड लावणारा उचलणार ट्रॉफी?

अवघ्या १३ दिवसांवर बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीचा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सर्वत्र कोण होणार बिग बॉसचा विजेता, कोणाच्या नावावर यंदाचा सीझन हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत.हा सीझन सुपरहिट ठरला आहे. बिग बॉस मराठी 5 अवघ्या 70 दिवसात प्रेक्षकांची रजा घेणार आहे.आता बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. बिग बॉस हा शो १०० दिवसांचा असतो. मात्र बिग बॉस मराठीचे यंदाचे सीझन लवकर संपत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी पाहायला मिळत आहे. जेव्हा पासून ग्रँड फिनालेची (Grand Finale ) तारीख घोषित करण्यात आली आहे. तेव्हापासून लोकांचे बिग बॉसचा विजेता कोण होणार याकडे लक्ष लागून आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहे.