विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून अंदाजे ४० हजार शाळा आज बंद राहतील.राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात येणार आहे. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरलेत.
