मंजुलिका परतली! ‘भूल भुलैया 3’ मध्ये आता…

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. कार्तिकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर तो आता निर्माता-दिग्दर्शकांचीही पहिली पसंती आहे.2024 मध्ये त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्तिक एकामागून एक 3 चित्रपटांमध्ये काम करणार आहे. ज्यात प्रेक्षकांना सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती ‘भूल भुलैया 3’ची.कार्तिक लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे तर दुसरीकडे या चित्रपटात नॅशनल क्रश तृप्ती डिमरी या चित्रपटात कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसेल अशा चर्चा असताना आता ‘भूल भुलैया 3’मधून तब्बूचा पत्ता कट झाल्याचे समोर आले आहे.

आता तब्बू ऐवजी विद्या बालन पुन्हा मंजुलिकाची भूमिका साकारणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, “भूल भुलैया 3 ची कास्टिंग सुरू आहे आणि निर्माते चित्रपटाच्या या तिसर्‍या भागात मंजुलिकाची भूमिका साकारण्यासाठी विद्या बालनशी चर्चा करत आहेत”.

‘भूल भुलैया’मध्ये विद्याने मंजुलिकाची भूमिका करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तर ‘भूल भुलैया 2’मध्ये तब्बूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा या चित्रपटात विद्या बालन दिसणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची शुटिंग फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. ‘भूल भुलैया 3’पूर्वी कार्तिक ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.