आ. शहाजी बापू पाटील यांच्याकडून कोळा परिसरात भरगोस विकास निधी

सांगोला तालुक्यातील कोळा परिसरात सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून व 25/15 या योजनेतून कोळे गावासाठी आलेला मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. संत तुकाराम नगर ते आश्रम शाळेपर्यंत डांबरी रस्ता करणे व संत तुकाराम नगर येथे सभा मंडप बांधणे, पांढरे पाटी ते तळेवाडी शिव डांबरी रस्ता करणे, आश्रम शाळा ते मोलमांगे वस्ती ते कॅनल पर्यंत डांबरी रस्ता करणे, कोळेकर वस्ती दर्याबामंदिरा समोर सभा मंडप बांधणे,  अमोल साखरे घर ते भारत बोधगिरी डॉक्टर घर डांबरी रस्ता करणे,  साहेबराव गुंडाळे वस्ती सभा मंडप 16  लिंब विठु सरगर यांच्या येथे लक्ष्मी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे,  महादेव पुजारी वस्ती वीर सभा मंडप बांधणे, 

कोळा जुनोनी रोड ते मदने वस्ती मदने वस्ती ते करांडे मोडा वस्ती ते गौडवाडी रोड डांबरी रस्ता करणे,  बोधगिरी वस्ती येथे जनजीवन मधून पाण्याची टाकी कोळा जुनोनी रोड ते शंकर मोरे वस्ती येथे डांबरीकरण करणे  व काँक्रिटीकरण करणे,  कोंबडवाडी येथे सिद्धनाथ मंदिर समोर सभामंडप बांधणे  तसेच कोळा जुनोनी रोड ते शंकर मोरे वस्ती येथे डांबरीकरण करणे काँक्रिटीकरण करणे कोंबडवाडी येथे सिद्धनाथ मंदिर समोर सभामंडप बांधणे, हरिभाऊ बोबडे घर ते गॅस गोडाऊन पर्यंत रस्ता करणे, सिद्धनाथ नगरी येथे हाय मस्ट बसवणे, खंडागळे वस्ती येथे हाय मस्ट बसवणे, माळेवाडी येथे हाय मस्ट बसवणे यासह आदी विकास कामासाठी भरघोस निधी आला असल्याचे कोळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य माणिक आलदर यांनी सांगितले.