दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता नारायण गडावर होणार दसरा मेळावा!

नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायण गडावर यायचं आहे. सर्वांनी एकजूट दाखवायची आहे. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही.अशी एकजूट आणि शक्ती दाखवा, अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही. मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान वेगाने मराठा समाज येणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ 12 वाजेची वेळ ठरलेली आहे, येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झालं. तरी 2 वाजेपर्यंत गडावरच राहायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.