टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन तसेच महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळावा पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री सुरेश खाडे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, अमोल बाबर, भाजपच्या नेत्या नीता केळकर, शिंदे गटाच्या उपनेत्या कला शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी टेंभू योजना ही आमदार अनिल भाऊंच्या प्रयत्नाशिवाय पूर्ण होऊ शकलेली नाही. अनिल भाऊंनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करून त्यासाठी निधीची अडचण येणार नाही हा माझा शब्द आहे.
टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाने शेतशिवार फुलणार आहेत तेव्हा अनिलभाऊ बाबर आशीर्वाद देतील. सहाव्या टप्प्यातील कामामुळे लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिलभाऊ बाबर यांचे नाव आपण देऊ असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.