कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. दुचाकीस्वाराच्या अचानक मृत्यू झाल्याने गावभर त्याच्या हत्येची चर्चा सुरु झाली होती.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील नवे पारगाव येथे सकाळी नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला होता. नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या आढळल्याने गावात खळबळ उडाली होती.
मृतदेह आढळल्यानंतर त्यांची हत्या झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी तातडीने नितीन भोसले यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता.
मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणाचा काहीच सुगावा लागत नव्हता. दरम्यान, नितीन भोसले यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या अंगावर भाजल्याचा जखमा आढळून आल्या. तसेच फुफ्फुसही जळल्याचे आढळले. त्यामुळे अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद दाखल केली.