कोल्हापुरात एकीकडे शिवसेनेचे महाअधिवेशन, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला मारहाण!

कोल्हापुरात एकीकडे शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडत असताना, दुसरीकडे एका शहरप्रमुखाला मारहाण झाली आहे. मारहाण झालेले नेते हे पट्टणकोडोलीचा शहर प्रमुख आहे.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ठाकरे गटाचे शहरप्रमुख आण्णासो जाधव यांना स्टेटस वरील रिप्लाय दिल्याच्या कारणाने बेदम मारहाण झाली. याबाबत रात्री हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील आण्णासो जाधव हे ठाकरे गटाचे शहरप्रमुख आहेत.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव पाच हजार कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे स्टेटस येथील जाधव यांचे पट्टणकोडोलीतील कार्यकर्ते विठ्ठल राम्मना याने ठेवले होते.