इचलकरंजीत बदलली राजकीय समीकरणे

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही वेळेस लागू शकते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार या चर्चेला तर उधाण आलेले आहे.

अशातच आता इचलकरंजीत आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीतून आवाडे विरुद्ध हाळवणकर असा उमेदवारीसाठी संघर्ष होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यासपीठावर हाळवणकर यांनी स्वतः आवाडे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश घडवून आणल्यामुळे राहुल आवाडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

तर महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या नावावर महाविकास आघाडीतील इच्छुक एकमत करण्याच्या विचारात आहेत.तसे झाले तर तेथे लढत जबरदस्त होणार आहे.