माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता क्रिकेटपटू जडेजा! लग्नाचीही तयारी झाली, पण एक घटना अन् The End

बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्समधील नातेसंबंध अनेकदा चर्चेचा विषय असतात. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपले जोडीदार बनवले आहे, पण दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू अजय जडेजा यांची प्रेमकहाणी देखील खूप रंजक आहे.माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका व्यावसायिक फोटोशूटदरम्यान झाली होती. या नात्याची चर्चा हळूहळू सुरू झाली असली तरी ही भेट माधुरीच्या वैयक्तिक आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती.

दोघांच्या नात्यात जवळीक वाढल्याने अजय जडेजाने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्याने माधुरीकडे मदत मागितली. पण जसजसे त्यांचे नाते पुढे गेले तसतसे अजयचे नाव 1999 मध्ये मॅच फिक्सिंगच्या वादात आले.मॅच फिक्सिंगच्या वादामुळे अजय जडेजाच्या केवळ क्रिकेट करिअरवरच परिणाम झाला नाही, तर माधुरीच्या कुटुंबीयांनी हे नातं स्वीकारले नाही.यानंतर माधुरीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने श्रीराम माधव नेने यांच्यासोबत विवाह केला.अजय जडेजानेही मार्च 2001 मध्ये त्याची शाळकरी मैत्रिण अदिती जेटलीशी लग्न केले.