बास्केट ब्रिजची वर्कऑर्डर निघून काही महिने झाले, तरी अद्याप काम सुरू नाही. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत इचकरंजीतील पाणी प्रश्नावर आमदार प्रकाश आवाडेही आक्रमक झाले.
इचलकरंजीला पाणी मिळावे, अशी तुमची इच्छा नाही, असा आरोप त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीत आवाडे आणि महाडिक यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारला.
इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून पालकमंत्र्यांवर निशाणा साधताना श्री. प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजीला पाणी मिळावे, अशी आमची इच्छा आहे; पण तुमची इच्छा नाही. त्यामुळे आम्हाला सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांकडून आणाव्या लागतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे काही घेणे-देणे नाही. जे प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
इचलकरंजी शहरात पाण्याच्या सहा टाक्या मंजूर झाल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले, असा सवालही आवाडे यांनी विचारला. टाक्यांसाठीची निविदा काढली आहे; मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काम थांबले होते. आता निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.