डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नगर विकास विभागाकडून तब्बल दोन कोटी निधी मंजूर करून घेतलेला होता.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या शुभ हस्ते व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले होते. बांधकामाच्या ठिकाणी चबुतराचे काम सुशोभीकरण पूर्णत्वास येत आहे या कामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने उद्या मंगळवारी म्हणजेच 8 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता भिमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.