आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात नेते मंडळींची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. उमेदवारी बाबतीत तर्क वितर्क देखील लावण्यात येत आहेत. सभा, मेळावे, मोर्चेबांधनी यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. अशातच हातकणंगलेचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी सोमवारी दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गत निवडणुकीत त्यांनी जोतिबाचे दर्शन घेऊनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांच्या समवेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
