महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात येणार अग्निशमन उपकरणे

इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्निशमन सेवांची उपकरणे बसविण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पाठवलेला आहे आणि याला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देखील दिलेली आहे. या निधीतून 300 अग्निशमन उपकरणे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेची सर्व कार्यालय आणि शाळा आगीच्या दुर्घटनेपासून वाचण्यास मदत होणार आहेत. ही उपकरणे तातडीने बसविण्यात यावेत आणि ती खरेदी करीत असताना त्याचा दर्जा चांगला असावा. किमान दोन ते तीन वर्षे टिकतील अशा कंपनीचे साहित्य खरेदी करण्यात यावे अशी आशा देखील व्यक्त केलेली आहे.