नेर्ले येथे उद्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरीची जागर यात्रा

काळमवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत काळम्मादेवी व नेर्ले (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरीची जागर यात्रा उद्या शुक्रवार दि. ११ रोजी असून यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले आहे. काळमवाडी येथे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पारायण सोहळ्यात हरिपाठ, काकडा, वाचन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. व्यासपीठ चालक म्हणून अशोक सावंत व बाबासाहेब सावंत यांनी काम पाहिले. १० रोजी पहाटे चार वाजता सहस्त्र दिव्यांचा दीपोत्सव व सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सांगता होणार आहे. काल्याचे कीर्तन जगन्नाथ सुतार महाराज यांचे होणार आहे.