बदलत्या वातावरणात घ्या आरोग्याची काळजी! घसा दुखणे, खवखवणे त्यात सर्दी, खोकलाही यावर घरगुती उपाय

सध्या सर्वत्र वातावरण हे बदलते आहे त्यातूनही आपल्याला आपल्या आरोग्याची काळजीही व्यवस्थित घेणे आवश्यक आहे. कधी पाऊस कधी ऊन पडताना दिसत आहे. त्यामुळेच या बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचेच आहे.अशावेळी व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, सर्दी, पडसं, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्या सतावू लागतात. त्यामुळे आपल्याला अशावेळी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे ठरते. ऐवढेच नाही तर हे इन्फेक्शन वाढले तर आपल्यालाही फार त्रास होतो. पाहुयात याबाबतच्या काही होम रेमिडीज म्हणजेच घरगुती उपाय कोणते आहेत.

मध आणि आलं : सर्दी, खोकला, घसा खवखवणे यावर मध उपायकारक आहे. तेव्हा तुम्ही मध आणि आलं यांचा वापर करू शकता. मध आणि आलं यांची पेस्ट करून तुम्ही खाऊ शकता.

हळदीचे दूध: सर्दी, खोकला झाल्यावर आपण त्वरित डॉक्टरांकडे जातो परंतु त्याहूनही तुम्ही घरगुती उपाय करत हा त्रास कमी करू शकता. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला हा जास्त रात्रभर जाणवत असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिऊ शकता.

हिंग: एका ग्लासमध्ये एक चमचा हिंग, आलं आणि मध घालून खाल्लास आपल्याला घसा खवखवणे, घसा दुखणे यापासून आराम मिळतो.

आलं आणि उकळलेलं गरम पाणी: आल्यामध्ये झिंजेरॉन आणि जिंजेरॉल असे गुणधर्म असतात. तेव्हा एका कपात आल्याचे तुकडे आणि पाणी टाकून तो उकळवून घ्या जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल. दिवसातून तुम्ही दोन-तीन वेळा हे घेऊ शकता.