आचारसंहितेपूर्वी निराधार योजनेचा लाभ घेण्याचे बाळासाहेब होनराव यांचे आवाहन

विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वीच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत. आज १० ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या बैठकीत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर केले जातील अशी माहिती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब होनराव यांनी दिलेली आहे. आटपाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीतील 170 प्रस्ताव मंजूर केले. प्रस्ताव मंजुरीसाठी येणाऱ्या कालावधीत विलंब लागू शकतो. यामुळे संजय गांधी निराधार योजना समितीने आज म्हणजेच गुरुवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे. पात्र लोकांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास त्यांना मंजुरी मिळू शकते. समिती जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे होनराव यांनी सांगितले.