सिटी वार्ताकडून सर्वांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंदू धर्मात पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा असं म्हटलं जातं. हिंदू धर्मातील विविध सण उत्सवातील दसरा हा एक महत्वाचा सण आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यक्ती घरात विविध वस्तूंची खरेदी देखील करतात.विजयाचं प्रतिक म्हणून साजरा केला जाणारा हा सण यंदा १२ ऑक्टोबर रोजी आहे.भारतात सण उत्सव म्हटलं की प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देतात. पूर्वी घरोघरी जाऊन शुभेच्छा दिल्या जात होत्या. मात्र आता व्यक्ती कामात इतके व्यस्त असतात की, त्यामुळे घरोघरी न जाता सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या जातात.

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याच्या सोन्याचे पान! विजयदशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा दसरा सण, सोने लुटून हे शिलगण, हर्षानं उजळू द्या अंगण; सर्वांना HAPPY Dussehra

आव्हानांच्या सीमा ओलांडून गाठू यशाचे शिखर! प्रगतीचे लुटू सोने अन् सर्वांमध्ये वाटू शुभ शुभेच्छा!

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व; सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी; सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी मंगलमय शुभेच्छा!