सुभाष मोरे यांना शस्त्रक्रियेसाठी एक लाखाचे अर्थसहाय्य……

हातकणंगले पाच तिकटी येथील बाबू जमाल तालीम मंडळाचे अध्यक्ष व माने गटाचे शिलेदार सुभाष मोरे यांना डॉक्टरांनी हीप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले होते. सुभाष मोरे यांनी मा. नगरसेवक रणजीत पाटील यांना शस्त्रक्रियेविषयी कल्पना दिली व ऑपरेशन शासकीय योजनेत बसवण्यासंदर्भात चर्चा केली. नगरसेवक रणजीत पाटील यांनी तातडीने खासदार धैर्यशील माने यांना माहिती दिली व त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष मुंबई येथील सर्व कागदपत्रासहित सततच्या पाठपुराव्याने रू.एक लाखाच्या हीप रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेला मंजूर मिळाली.

तसेच रक्कम खात्यावर जमा झाली त्याच्या अनुषंगाने हीप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया हिरेमठ हॉस्पिटल जयसिंगपूर येथे यशस्वीरित्या पार पडली. मोरे कुटुंबीयांच्या पाठीशी राहिल्याबद्दल व विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार धैर्यशील माने व नगरसेवक रणजीत पाटील तसे स्वप्निल चौगुले यांचे मोरे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.