हेरले -मौजे वडगाव रस्त्यावरील विहिरीला संरक्षक कठडे बांधण्याची वाहनधारकांची मागणी

सध्या अनेक भागात खूपच सेवा सुविधांचा अभाव जाणवतो. रस्ते, वाहतूक, पाणी याबाबतीतही काही ना काही समस्या या जाणवतात. अलीकडे सऱ्हास वाहतुकीची कोंडी पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे देखील नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. हेरले येथील हेरले मौजे वडगाव रस्त्यावरील पाटील मळ्या जवळील विहिरीला संरक्षक कठडा बांधण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी विहिरीला चार ते पाच वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची पाने लावून संरक्षण भिंत उभी केली आहे.

वर्दळीच्या या मार्गावर कोणत्याही क्षणी लहान मोठे अपघात घडून वाहन विहिरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्ता एका बाजुला खचला असल्यामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. येथील मार्गावरून पेठवडगाव, शिरोली एमआयडीसी व पुढे महामार्गाला जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. शिवाय या म ार्गावरून स्कूलबसेसची दैनंदिन ये- जा चालू असते. तरी सदर विहिरील कठडा बांधून घेणे अथवा लोखंडी ग्रील लावणे आवश्यक आहे. या बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वेळीच खबरदारी घेऊन या विहिरीला संरक्षक कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.