इंधनासाठी इथेनॉलचा वापर होतो .टाकाऊ पदार्थ म्हणून साखर कारखाने याकडे पाहत होते .बगॅस रस्त्यावर टाकल्या जाया च्या याचा उपयोग होऊ लागला आहे. प्रसमेडचे महत्त्व सुद्धा खत म्हणून वाढले आहे .ऊस पिक ही शेतकऱ्यांची संजीवनी आहे. 15 नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू होतील ,असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांनी केली.
नायकवडी म्हणाले, ऊस तोडणी करिता 35 टोळ्या आल्या आहेत .परंतु 15 नोव्हेंबर शिवाय साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे खर्चाचा बोजा वाढला आहे. इथेनॉल दैनंदिन 50 हजार टन उपलब्ध होईल. जनावरांना लंम्पी आजाराची लस देणे तसेच उपचार करणे महत्त्वाचे आहे. जागतिक बाजारात 50 रुपये जास्त साखरेचा दर आहेत .यावेळी गौरव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.