कोयना धरणातून सांगलीसाठी पुन्हा विसर्ग, टेंभू योजनेचे उद्यापासून आवर्तन होणार सुरू

कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती.

त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी सकाळी ११ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.बुधवारी सकाळी टेंभू योजनेचे विद्युत पंप सुरू करून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे, असे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी नसल्यामुळे कोयना धरणातून २२ डिसेंबरपासून विसर्ग बंद केला होता.

परिणामी, टेंभू योजना सुरू करण्यात अडचणी येणार आहेत. याची दखल घेऊन जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरण व्यवस्थापनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली.